SA VS IND 3rd Test :- कॅप्टन विराट केपटाऊन मध्ये कमबॅक करणार का..

India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरूवात हणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करेल, असं मानलं जातंय. विराटच्या कमबॅकनंतर एका खेळाडूला बाहेर बसावं लागणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी आणि अखेरची टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. 11 जानेवारीपासून या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यातून कर्णधार विराट कोहलीचं कमबॅक निश्चित मानलं जातंय, पण विराट टीममध्ये आल्यानंतर बाहेर कोणाला बसवलं जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Indian Cricket Team Ex-Vice Captain Ajinkya Rahane

टेस्ट टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) दुसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतक केलं होतं, पण त्याला बाहेर ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो. रहाणेचं सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये अर्धशतक थोडक्यासाठी हुकलं होतं.

याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजची अखेरची मॅच रहाणे खेळू शकला नव्हता. रहाणेला पुन्हा गवसत असलेला सूर बघता, त्याला टीममध्ये कायमही ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

विराटच्या पुनरागमनानंतर चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) नावाचाही विचार केला जाऊ शकतो. पुजारा अनुभवी क्रिकेटपटू आहे, त्याने आतापर्यंत 94 टेस्ट खेळल्या आहेत.

मागच्या सामन्यात त्याने अर्धशतक केलं असलं, तरी काही काळापासून तो संघर्ष करत आहे. 2019 साली पुजाराने अखेरचं शतक झळकावलं होतं.


हनुमा विहारीने (Hanuma Vihari) जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 40 रनची झुंजार खेळी केली, पण तरीही त्याचं नाव टीममध्ये निश्चित नाही. याआधी इंडिया-ए कडूनही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटची पाठदुखी आणि श्रेयस अय्यरचं पोट खराब असल्यामुळे विहारीला संधी मिळाली, म्हणजेच विहारी पहिल्या पसंतीचा खेळाडू नसल्याचं स्पष्ट झालं.

फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) पूर्णपणे फिट नसल्याचं राहुल द्रविडने सांगितलं. केपटाऊन टेस्टपर्यंत सिराज फिट झाला नाही तर त्याच्याऐवजी उमेश यादवला संधी मिळू शकते.

पण जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारताची बॅटिंग अपयशी ठरली, त्यामुळे 7 बॅटर आणि 4 बॉलर खेळवण्याचा निर्णय झाला तर सिराजची जागाच विराट घेईल.

Source: News18 Lokmat / SA vs IND 3rd Test Match

Post a Comment

Previous Post Next Post